खासगीकरणाला विरोध करण्यासाठी बॅंक कर्मचारी दिल्लीत निदर्शने करणार

मुंबई -देशातील सार्वजनिक बॅंकांच्या संभाव्य खासगीकरणाविरोधात बॅंक कर्मचाऱ्यांच्या युनायडेट फोरम ऑफ बॅंक युनियन्सने एकदिवसीय धरणे आंदोलनकरणशर असल्याचेसांगीतले आहे. बुधवारी लोकसभेसमोर होणा-या या आंदोलनात कर्मचाऱ्यांच्या विविध 9 संघटनांचे राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकारी सहभागी होतील. या आंदोलनात एआयबीए-एआयबीओए, आयबोक-इन्बेफ, एनसीबीई-इन्बोक, बेफी, एनओबीडब्ल्यू, नोबो या संघटनांचे राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकारी सहभागी होतील.

देशातील बहुतेक सार्वजनिक बॅंका थकीत कर्जाच्या तरतुदीमुळे तोट्यात आहेत. या थकीत कर्जांमध्ये मोठ्या उद्योगांचा वाटा 70 टक्‍क्‍यांपर्यंत आहे. त्यात नीरव मोदी आणि मेहुल चोक्‍सी यांच्या घोटाळ्यांमुळे सार्वजनिक बॅंकांची प्रतिमा मलिन केली जात आहे. अनेक नेत्यांनी आणि उद्योजकांच्या संघटनानी सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांचे खासगीकरण करण्याची मागणी केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे. यामुळे हा प्रश्‍न सुटणार नसल्याचे कर्मचाऱ्याचे म्हणने आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)