खाशोग्गींचा मृतदेह ऍसिडमध्ये विरघळवला 

अंकारा,  (तुर्की) – सौदी अरेबियाचे पत्रकार जमाल खाशोगी यांची हत्या करणाऱ्यांनी त्यांच्या मृतदेहाचीही पद्धतशीरपणे विल्हेवाट लावल्याचा दावा तुर्कीतील एका वर्तमानपत्राने केला आहे. खाशोगी यांचा मृतदेह मारेकऱ्यांनी ऍसिडमध्ये विरघळवला आणि त्यांचे उर्वरित अवशेष थेट ड्रेनेजमध्ये ओतून दिले, असे या वर्तमानपत्राच्या बातमीमध्ये म्हटले आहे. इस्तंबुलमधील सौदी दूतावासाच्या ड्रेनेजमधून जमा केलेल्या नमुन्यांची तपासणी केली असता, त्यामध्ये ऍसिडचे अंश आढळून आले आहेत. त्यामुळेच सौदी दूतावासाची तपासणी करणाऱ्यांना खाशोगी यांचा मृतदेह मिळू शकला नाही. त्यांच्या मृतदेहाचे कोणतेही अवशेषही शिल्लक राहिलेले नाहीत, असेही यावृत्तामध्ये म्हटले आहे. मात्र या दाव्याच्या पुष्ट्यार्थ कोणाही अधिकाऱ्याचे वक्‍तव्य या बातमीमध्ये देण्यात आलेले नाही. त्यामुळे या वृत्ताची सत्यता पडताळून बघितली जाऊ शकलेली नाही.

खाशोगी हे लवकरच लग्न करण्याच्या तयारीत होते. त्यासाठी लागणारी काही कागदपत्रे आणण्यासाठी 2 ऑक्‍टोबरला ते सौदी दूतावासामध्ये गेले होते. त्यानंतर त्यांना कोणीही बघितलेले नाही. खाशोगी यांच्या मृत्यूबाबत वारंवार जबाबदारी झटकल्यानंतर अखेर सौदीने खाशोगी यांची हत्या दूतावासामध्येच झाल्याचे मान्य केले होते. खाशोगी यांची हत्या सौदीचे युवराज मोहंम्मद बिन सलमान यांनीच करवली आहे, असाउघड आरोप तुर्कीचे अध्यक्ष रेसिप तैय्यप इर्डोगन यांनी केला आहे.

———————–


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)