खाशोगी हत्या प्रकरणावरून सौदीला वाऱ्यावर सोडणार नाही : डोनाल्ड ट्रम्प 

वॉशिंग्टन: पत्रकार खाशोगी हत्या प्रकरणात सौदीच्या सत्ताधाऱ्यांना जबाबदार न धरण्याच्या आपल्या भूमिकेचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जोरदार समर्थन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की या प्रकरणावरून आम्ही सौदी अरेबियाशी असलेले आमचे संबंध तोडून त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.

पत्रकार खाशोगींची हत्या सौदीच्या क्राऊन प्रिंस यांच्या सांगण्यावरूनच करण्यात आल्याचे जवळपास सर्वच तपासातून निष्पन्न झाल्यानंतर अध्यक्ष ट्रम्प सौदी बाबत काय भूमिका घेतात याकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष लागले होते. त्या पार्श्‍वभूमीवर ट्रम्प यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की तेलाच्या किंमती आटोक्‍यात ठेवणे हे अमेरिकेच्या हिताचे आहे त्यामुळे आम्ही सौदी अरेबियाशी राजनैतिक संबंध तोडणार नाही.

-Ads-

अमेरिका माझ्या साठी प्रथम आहे असे त्यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. ट्रम्प अशी भूमिका घेऊन एक प्रकारे दहशतवदालाच खतपाणी घालत आहेत अशी टीका त्यांच्यावर अमेरिकेतूनच सुरू झाली आहे त्या विषयी विचारले असता ते म्हणाले की या आरोपात तथ्य नाही. दहशतवादाचा नायनाट करणे ही आमची प्राथमिक भूमिका आहे.

दरम्यान ट्रम्प यांच्या या भूमिकेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे सिनेटर डायने फेईनस्टेईन यांनी म्हटले आहे की खाशोगी हत्या प्रकरणात सौदीचे प्रिंस मोहंमद बिन सलमान यांना जबाबदार न धरण्याची ट्रम्प यांची भूमिका धक्कादायक आहे. आम्ही या प्रकरणावरून अमेरिकेने सौदीला शस्त्रे विकण्यास बंदी घालण्याचा निर्णय घ्यावा असा ठराव मांडणार आहोत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)