खाशोगी प्रकरणी युवराजांबाबत मर्यादा निश्‍चित- सौदी 

लंडन – सौदीचे पत्रकार जमाल खाशोगी यांच्या हत्येप्रकरणाच्या तपासादरम्यान युवजार मोहम्मद बिन सलमान यांच्याबाबत वक्‍तव्य करण्यापूर्वी मर्यादेचे भान राखले जावे. युवराज मोहम्मद किंवा त्यांच्या वडिलांबाबत मर्यादा सोडून केलेले आरोप सहन केले जाणार नाहीत असे सौदीचे विदेश मंत्री अदेल अल जुबेर यांनी म्हटले आहे.
सौदी अरेबियामध्ये नेतृत्व ही लाल रेष समजली जाते. सौदीचे राजे सलमान आणि युवजार या दोन महनीय व्यक्‍ती सौदीतील प्रत्येक नागरिकाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यांच्याबाबत मर्यादा कायम राखली जायला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.

खाशोगींच्या हत्येमागे युवराज मोहम्मद बिन सलमान यांचा हात असल्याचा आरोप अमेरिका, तुर्की आणि अन्य युरोपीय देशांकडून व्हायला लागला आहे. “सीआयए’ या अमेरिकेच्या गुप्तचर संघटनेच्या तपासातील काही अंश प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार या हत्येत युवराजांचा थेट हात होता, असे म्हटले आहे. त्याच्या पार्श्‍वभुमीवर जुबेर यांनी हा इशारा दिला आहे. तुर्कीच्या आरोपांनाही सौदीने प्रत्युत्तर दिले आहे आणि तुर्कीने या आरोपांच्या पुष्ट्यार्थ पुरावे द्यावेत, असे म्हटले आहे. खाशोगी यांच्या हत्येप्रकरणी सौदी अधिकाऱ्यांनी 21 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी पाच जणांना सौदीतील तपास न्यायाधिकरणाने फाशीची शिक्षाही सुनावली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)