खाशोगींच्या हत्येप्रकरणी सौदीच्या 5 अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा 

रियाध: इस्तंबुलमध्ये सौदी दूतावासात पत्रकार जमाल खाशोगी यांची हत्या आणि मृतदेहाची विल्हेवाट लावल्याप्रकरणी सौदी अरेबियाया पाच अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. खाशोगी यांच्या हत्येविरोधात जगभरातून निंदा आणि टीका व्हायला लागल्यावर तपास अधिकाऱ्यांनी हे कठोर पाऊल उचलले आहे. मात्र या हत्या प्रकरणातून युवराज मोहम्मद बिन सलमान हे मात्र सहभागी नसल्याचा निर्वाळाही तपास अधिकाऱ्यांनी दिला आहे.

खाशोगी यांना बेशुद्ध करून त्यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट करण्यात आली असे सरकारी वकिलांच्या कार्यालयातून सांगण्यात आले होते. यांच्या मृतदेहाचे अवशेष दूतावासाबाहेर तपास अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले होते. मात्र या हत्येमध्ये युवराज मोहम्मद यांना या हत्येबाबत काहीच माहिती नव्हती, असेही या प्रवक्‍त्याने म्हटले आहे.

-Ads-

खाशोगी यांच्या हत्येप्रकरणी एकूण 21 जणांना कोठडीत ठेवण्यात आले होते. त्यापैकी 11 जणांना हत्या प्रकरणात सहभागी करून घेण्यात आले तर अन्य लोकांबाबत तपास सुरू आहे. खाशोगी यांच्या हत्येचा तपास आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणेकडून करण्याची मागणी तुर्कीने बुधवारी केली. खाशोगी यांच्या हत्येपूर्वीच्या रेकॉर्डिंगनुसार या हत्येचा संबंध सौदी, अमेरिका आणि पाश्‍चात्य देशांशी जोडला जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)