खाशोगींचा मृतदेह ताब्यात देण्याची पुत्रांची मागणी

वॉशिंग्टन: हत्या करण्यात आलेले सौदीचे पत्रकार जमाल खाशोगी यांचा मृतदेह सौदी सरकारने अंत्यविधीसाठी आमच्या ताब्यात द्यावा अशी मागणी त्यांच्या मुलांनी केली आहे. खाशोगी यांची तुर्कस्तानमधील इराणच्या दूतावासात 2 ऑक्‍टोबर रोजी हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडला होता.

आम्हाला आमच्या वडिलांच्या मृतदेहावर सन्मानाने अंत्यसंस्कार करायचे आहेत त्यामुळे सौदीने त्यांचा मृतदेह आमच्या ताब्यात देण्याची कृपा करावी अशी मागणी खाशोगी यांचे चिरंजीव अब्दुला खाशोगी यांनी एका अमेरिकन दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केली. ते म्हणाले की त्यांचा दफनविधी मदिनात करण्याची आमच्या कुटुंबाची इच्छा आहे. दरम्यान त्यांच्या मृतदेहाची या आधीच तुर्कीत विल्हेवाट लावण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. ऍसिड टाकून त्यांचा मृतदेह नष्ट करण्यात आल्याची आपली माहिती आहे असे तुर्कीच्या अध्यक्षाचे सल्लागार यासिन अक्‍त्याय यांनी म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)