पिरंगुट- मान अभिमान विकास फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणारा ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव राष्ट्रीय पुरस्कार मुळशी तालुक्यातील दोघांना नुकताच प्रदान करण्यात आला. कुस्ती क्षेत्रातील कामगिरीबद्दल चंद्रकांत मोहोळ व सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल विशाल भिलारे यांना हा पुरस्कार भोसरी येथील समारंभात प्रदान करण्यात आला. स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरुप होते. भारतीय कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष हरीश कदम, अजय साळुंखे, काका पवार, शाम शिंदे, विनोद कदम आदींच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. मोहोळ यांनी मामासाहेब मोहोळ कुस्ती महासंघाची स्थापना करून सातत्याने कुस्तीच्या स्पर्धांचे आयोजन केलेले आहे. जिल्हा स्तरापासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पंच म्हणून 17 वर्षे कामगिरी बजावलेली आहे. भिलारे यांनी तालुक्यात विविध क्रीडा स्पर्धा, गरीब कुटुंबांना आर्थिक मदत, शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप आदी सामाजिक उपक्रम सातत्याने राबविलेले आहेत.
खाशाबा जाधव राष्ट्रीय पुरस्कार मुळशीतील दोघांना प्रदान
Ads