खालचा मळा रस्त्याचे काम सुरू

मंचर- चांडोली खुर्द (ता. आंबेगाव) येथे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या निधीतून बारा लाख रुपये खर्चून तयार करण्यात येणाऱ्या खालचा मळा रस्त्याचे भूमिपूजन समारंभ भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ लांडेवाडीचे अध्यक्ष बी. डी. आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले. रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजनप्रसंगी माजी सरपंच बी. टी. बांगर, शिवसेना तालुकाप्रमुख सुनील बाणखेले, सरपंच शांता इंदोरे, उपसरपंच संदीप वाबळे, माजी उपसरपंच राजेश बांगर, ग्रामपंचायत सदस्य जयश्री इंदोरे, मनीषा इंदोरे, सुजाता इंदोरे, रोहिणी अरगडे, गणेश इंदोरे,स्वप्निल घोडे, प्रकाश इंदोरे, अमोल दाभाडे, संतोष इंदोरे, सदानंद घुले, सुनील वाबळे, माजी सरपंच बबनराव शिंदे, चित्रा इंदोरे यांसह विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)