खारीची अशी कृतज्ञता…

एखाद्याचे प्राण वाचवल्यावर असा माणूस नेहमी कृतज्ञ राहू शकतो. मात्र, अशी भावना पशुपक्ष्यांमध्येही असेल असे आपल्याला वाटणार नाही. एका जपानी माणसाने पेंग्विनचे प्राण वाचवले होते. हे पेंग्विन दरवर्षी या माणसाला भेटण्यास येत असते. असाच एक प्रकार अमेरिकेत घडला आहे. 2009 मध्ये ब्रेन्टले हॅरिसन व त्यांच्या कुटुंबीयांनी एका जखमी खारीला वाचवले होते. तिच्यावर उपचार करून ती बरी झाल्यावर तिला सोडून दिले होते. ही खारूताई हे उपकार विसरलेली नाही हे विशेष. ती आठ वर्षांपासून जवळजवळ रोजच या कुटुंबाला भेटण्यासाठी येत असते!

साऊथ कॅरोलिनामधील या कुटुंबाने खारीला “बेला’ असे नाव दिले आहे. बेलावर एका घुबडाने हल्ला केला होता व त्यामध्ये ती बरीच जखमी झाली होती. या कुटुंबाने आधीच तीन खारी पाळल्या असल्याने त्यांना खारींशी कसे वागावे याचे ज्ञान होते. त्यांनी आपल्या पाळीव लॅरी, कर्ली आणि मोई नावाच्या खारींसमवेत या खारीलाही ठेवून तिच्यावर योग्य ते उपचार केले. एक वर्षभर ही खार त्यांच्यासमवेत राहिली. ती पूर्णपणे बरी झाल्यावर तिला सोडून देण्यात आले. ती पुन्हा परत येईल असे त्यांना वाटले नव्हते. मात्र, ती जवळजवळ रोज एकदा येऊन त्यांना भेटून जाते. बेला आता अतिशय लोकप्रिय झाली आहे. तिचे एक इन्स्टाग्राम पेजही असून त्यावर चार हजारांपेक्षाही अधिक फॉलोअर्स आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)