खामोश! परिस्थिती काहीही असो निवडणूक ‘पटणा साहिब’मधूनच लढवणार : शत्रुघ्न सिन्हा कडाडले

आपल्या फील्मी करीअरमध्ये ‘शॉर्ट गन’ या नावाने ओळखले जाणारे शत्रुघ्न सिन्हा आपल्या राजकीय करियरमध्ये देखील रोखठोक टीकेसाठी प्रसिद्ध आहेत. पक्षीय मर्यादा, वरिष्ठ नेत्यांचा दबाव या सर्वांना न जुमानता शत्रुघ्न सिन्हा यांनी गेल्या काही दिवसांपासून भाजप नेतृत्वावर उघड टीका केल्याने नाराज पक्षश्रेष्ठींनी शत्रुघ्न सिन्हा यांचे लोकसभेचे तिकीट कापले आहे.

दरम्यान, भाजपमध्ये असून देखील पंतप्रधानांवर टीका करण्याचे धाडस दाखविणारे शत्रुघ्न सिन्हा विरोधकांना चांगलेच प्रीय झाले असल्याने भाजपने तिकीट कापल्यानंतर ते काँग्रेसमध्ये प्रवेश करतील असे कयास बांधले जात होते. अशातच आज शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली असून आपण लवकरचं काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

यावेळी पत्रकारांनी शत्रुघ्न सिन्हा यांना आपण पाटणा साहिब मधून निवडणूक लढविणार काय? असा प्रश्न विचारला असता आपल्या खास शैलीमध्ये उत्तर देताना शत्रुघ्न सिंह यांनी, “परिस्थिती काहीही असो आपण पाटणा साहिब मधूनच निवडणूक लढवणार” असे ठणकावून सांगितले.

https://twitter.com/ANI/status/1111208176924413952

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)