खामुंडीजवळ अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

ओतूर-नगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील खामुंडी (ता. जुन्नर) येथे कारची दुचाकीस्वाराला धडक बसून दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे, ही घटना मंगळवारी (दि. 11) रात्री आठच्या सुमारास घडली.
अक्षय जालिंदर सोमोशी (वय 24, रा. शिरोली खुर्द, ता. जुन्नर) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अशोक नाथा सोमोशी (वय 41) यांनी ओतूर पोलीस ठाण्यात खबर दिली. या ओतूर पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार के. एम. पाटोळे यांनी अधिक माहिती अशी दिली की, ओतूर बाजूकडून आळेफाटा बाजूकडे दुचाकी (एमएच 14 सीआर 8318) जात असताना आळेफाटा बाजूकडून ओतूर बाजूकडे येणाऱ्या कारने (एमएच 14 जीएस 7301) दुचाकीस समोरासमोर जोरदार धडक दिली. यात अक्षय सीामोशी याच्या दोन्ही पायाला, उजवा हात मोडून डोक्‍याला, पोटाला गंभीर दुखापत झाली यात त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कार खड्ड्यात गेली. या अपघाताबाबत ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश खुणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पी. एन. मोहरे करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)