खामगावमध्ये चोरट्यांनी घर फोडले

-कुलूप तोडून सोन्याचे अडीज तोळ्याचे दागिने आणि 4 हजार चोरले
यवत – दौंड तालुक्‍यातील खामगाव येथे बंद घराचे रात्रीच्या वेळी कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातील कपाटाच्या लोखंडी पेटीतील सुमारे अडीच तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम अशा 60 हजार रुपयांच्या ऐवजाची चोरी झाल्याची घटना रविवारी (दि.27) रोजी रात्रीच्या सुमारास घडली. या चोरीप्रकरणी संतोष रामचंद्र नागवडे (वय 32 वर्षे रा.खामगाव, ता.दौंड, जि. पुणे) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नागवडे यांचे बंद असलेल्या घराचे अज्ञात चोरट्याने कटावणीच्या साहाय्याने दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. घरात असलेल्या लाकडी कपाटातील ड्राव्हरमधील लोखंडी पेटीत ठेवलेले सोन्याचे अडीच तोळ्यांचे दागिने आणि 4 हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण 60 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरी करून नेला.
पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. अशाच प्रकारची चोरी दि.25 एप्रिल भरदिवसा खामगाव येथून बंद घराचे कुलूप तोडून रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने असा 2 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरला होता. त्यावेळी झालेल्या चोरीचा अद्याप तपास लागला नसतानाच या झालेल्या चोरीमुळे खामगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश राठोड करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)