खामगावच्या शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांना मनिऑर्डर

कांद्याच्या 18 गोण्यांच्या विक्रीतून हाती आले 376 रुपये

गोपाळपूर – कांद्याच्या मिळालेल्या बाजाराभावाचा थेट पुरावा काही शेतकऱ्यांनी मनिऑर्डरने मुख्यमंत्र्यांना पाठवला होता, तर काहींनी बाजारात मोफत कांदा वाटप करून शासनाचा निषेध केला होता. शुक्रवारी( दि.11) नेवासा तालुक्‍यातील चिकणी खामगाव येथील एका शेतकऱ्याला 18 गोण्यामधील 916 किलो कांद्यावरील खर्च वजा जाता हातात आलेल्या 376 रूपयाची मनीऑर्डर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवून संताप व्यक्त केला.

नेवासा तालुक्‍यातील चिकणी खामगाव येथील विकास बाबासाहेब काळे यांनी पांडुरंग मुरलीधर काळे यांच्या नावे तिन दिवसांपुर्वी घोडेगाव बाजारात 18 गोण्या कांदा विक्रीस नेला होता. तेथे लिलाव झाल्यानंतर पट्टी घेण्यासाठी घोडेगाव बाजारात गेल्यावर मिळालेले पैसे पाहून ते अवाक्‌ झाले. काळे यांना आठ गोण्यातील 419 किलो कांद्याला 1 रूपये 50 पैसे प्रति किलोप्रमाणे 628 रूपये तर दोन नंबर कांद्याच्या 10 गोण्यातील 497 किलो कांद्यास एक रूपये किलो प्रमाणे 497 रूपये भाव मिळाला होता. त्याचे एकून 1126 रूपये पट्टी झाली होती, त्यामधील 48 रूपये हमाली, 36 रूपये तोलाई, 666 रूपये गाडी भाडे असे एकून 750 रक्कम खर्चाची कपात करून केवळ 376 रूपये हातात मिळाले.त्यांनी हे पैसे सरळ मुख्यमंत्र्यांना पाठवून शेतकऱ्यांच्या समस्यांचे वास्तव मांडले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या मनिऑर्डर सोबत एक पत्र लिहून सर्व शेतकरी कसे मेटाकूटीला आले आहेत व शासन शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाकडे कसे दुर्लक्ष करत आहे ते पटवून देत कांद्याला लागलेला एकरी खर्च किती व मिळणारे उत्पन्न किती याचा तपशील मांडला आहे. कांदा बी, लागवड, औषधे व खते, नांगरट, खुरपणी, कामगार, रिकाम्या गोण्या, कांदा वाहतूक असे एकरी 72 हजार 522 रूपये खर्च लागत असतो तर मिळणारा एकरी भाव अकरा ते बारा हजार रूपये मिळत असल्याने शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नसल्याचे सांगितले आहे. सरकार हमीभाव देताना त्यात फक्त उत्पन्न खर्च तोही तुटपुंज्या स्वरूपात पकडला जात असल्याने त्यात व वास्तवतेत मोठी तफावत असते. त्यामुळे आर्थीक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे.

आजही अनेक शेतकऱ्यांचे कांदे लाखो रुपये खर्च करून ही भाव नसल्याने चाळीमध्ये सडत पडले आहे. तरीही सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेत नसल्याने नाराजी वाढत असून कांद्याचे भाव गडगडल्याने राज्यातील अनेक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांना आता काय करावे असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)