खान्देशी महिलेचे धाडस : पर्यावरण वाचवण्यासाठी असाही एक प्रयत्न

आता सर्वांनाच परिचित आहे की, सिनेमा हे माध्यम प्रचंड लोकप्रिय आणि प्रभावी आहे. प्रेक्षक त्याच्याकडे फक्त मनोरंजन विश्व म्हणून बघत असला तरी फिल्म मेकर्स वेगवेगळे चाकोरीबाह्य आजकाल हाताळत आहेत. पण या माध्यमातून खूप मोठे विषय लोकांपर्यंत पोहोचवणे हा मोठा टास्क असतो. असाच वेगळा विचार करून जळगाव जिल्ह्यातील जामनेर गावातील एका सामान्य कुटुंबातून आलेल्या विद्या गवई यांनी “वंजर” या सिनेमाला सुरुवात केली आहे. आता हा सिनेमा लवकरच सर्वांसमोर येणार आहे.

झाडे लावा, झाडे जगवा असा उदोउदो आपण करत असलो तरी त्यासाठी आपण स्वतः त्यासाठी एक पाऊल उचलणे महत्वाचे ठरते. अशाच आशयाचा वंजर सिनेमा विद्या गवई दिग्दर्शित लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. आसरा फिल्म प्रॉडक्शन निर्मित या सिनेमाचे मोशन पोस्टर विजयादशमीच्या निमित्ताने प्रदर्शित झाले. लवकरच या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. चित्रपट सुरू होण्याआधीच सिनेमाचे मोशन पोस्टर रिलीज होणारा हा पहिला मराठी सिनेमा आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दिग्दर्शिका विद्या गवई या एका सामान्य कुटुंबातून आल्या आहेत. त्यांनी लहानपणी जंगलातून फिरणे, झाडं जपणे या सगळ्या गोष्टी पाहिल्या होत्या. पण सध्याच्या काळात कुठे तरी झाडं तोडली जात आहेत, आणि त्याला आपणच जबाबदार आहोत हे त्यांच्या लक्षात आले. म्हणून त्यांनी हा विषय सिनेमाच्या माध्यमातून सर्वांसमोर मांडण्याचा विचार केला. या सिनेमाच्या मोशन पोस्टरमध्ये निसर्ग ही आपली देणगी आहे आणि ती नष्ट करण्याचा आपल्याला काहीच अधिकार नाही, असा संदेश देण्यात आला आहे. लवकरच सिनेमातील कलाकारांची घोषणा करण्यात येणार आहे. कथा,पटकथा विद्या गवई यांची असून, सवांद आणि प्रमुख सहाय्यक मनोज सोनवणे असून सिनेमाच्या निर्मिती प्रमुखाची सूत्र रंगराव घागरे सांभाळत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)