खानेवाडीतील बिबट्या जेरबंद

चार दिवसांपूर्वी घेतला होता चार महिन्यांच्या बालिकेचा बळी

नारायणगाव-जुन्नर तालुक्‍यातील येडगाव परिसरातील खानेवाडी येथे वनविभागाने लावलेल्या 26 जानेवारीला पहाटेच्या सुमारास पिंजऱ्यात 6 वर्षांची मादी असलेला बिबट्या जेरबंद झाला असल्याची माहिती ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी बी. सी. येळे यांनी दिली आहे. दरम्यान या पकडलेल्या बिबट मादीनेच 4 महिन्याच्या बालिकेचा बळी घेतला असल्याची शक्‍यता स्थानिक ग्रामस्थांनी वर्तविली आहे.
खानेवाडी येथील धनगराच्या वाड्यावरून कल्याणी सुखदेव झिटे (वय 4 महिने, रा. मूळ जांबूत बुद्रुक, ता. संगमनेर; सध्या येडगाव, ता. जुन्नर) या बालिकेला बिबट्याने फरपटत ओढून नेऊन मृत्युमुखी पाडल्याची घटना 23 जानेवारीला मध्यरात्री तीनच्या सुमारास घडली होती. या घटनेमुळे वन विभागाने या परिसरात 4 ठिकाणी पिंजरे लावले होते. त्यापैकी धनगराच्या वाड्यापासून शंभर फुटावर हा पिंजरा त्याच दिवशी लावण्यात आला होता. 26 जानेवारीला पहाटे पाचच्या सुमारास ही मादी पिंजऱ्यात जेरबंद झाली. या मादीला माणिकडोह बिबट निवारा केंद्रात दाखल केले आहे. गेली तीन दिवसापासून वन विभागाचे उपवनसंरक्षक जयरामे गौडा आर., सहाय्यक वनसंरक्षक मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी बी. सी. येळे, वनपाल एस. आर. खट्टे, वनरक्षक के. जी. भालेराव, वनसेवक भोर, वामन व गुळवे यांनी प्रयत्न सुरु केला होते. बिबट्या जेरबंद होण्यासाठी सरपंच गणेश गावडे, अनिकेत ढमक, अनिकेत जोरे, सूरज ढमक, शरद नेहरकर, गिरिश बांगर आदींनी खूप मदत केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)