खानवडीत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नायगाव – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खानवडी (ता. पुरंदर) येथे दिलीप जगताप मित्र परिवार आणि उद्योजक राजू गिरमे यांच्या माध्यमातून, तसेच सामाजिक कार्यकर्ते संतोष गायकवाड आणि नायगावचे ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत चौंडकर यांच्या सहकार्यातून विध्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल आदी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ठेकेदार संतोष गिरमे होते. यावेळी संतोष गायकवाड, चंद्रकांत चौंडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर नेटके, शिक्षिका मोरे, उद्योजक संतोष गिरमे, काळूराम होले, अर्जुन पाटोळे, रियाज सय्यद, महादेव सोनवणे, वैभव कड, संतोष डुबल आदी उपस्थित होते. प्रास्तविक श्‍यामकुमार मेमाणे यांनी केले. आभार शंकर नेटके यांनी मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)