खानवडीत कायदा साक्षरता शिबिर उत्साहात

नायगाव- अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय, विद्यार्थी विकास मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या वतीने खानवडी (ता. पुरंदर) येथे “कायदा साक्षरता शिबिर’ आयोजित करण्यात आले होते. यावेळी ऍड. अविनाश भारंबे यांनी विद्यार्थी व ग्रामस्थांना कायदे विषयक मार्गदर्शन केले. अजित चव्हाण याने “वाढती गुन्हेगारी’ या विषयी, शुभम जोशी यांनी “माहिती अधिकार कायदा’, गौरी चितळे यांनी “महिला विषयक कायदे’ या विषयावर ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. प्रा. मनोज वानरे यांनी “जमीन अधिग्रहण कायदा’ विषयी माहिती दिली. सूत्रसंचालन प्रसाद वारकर यांनी केले. कार्यक्रमानंतर ग्रामस्थांना मोफत कायदे विषयक मार्गदर्शन, गावात कायदा सर्वेक्षण तसेच पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ऍड. भरत बोरकर, ऍड. सतिश राणे, ऍड. अमोल वाघमारे, बहुजन हक्‍क परिषद अध्यक्ष सुनील धिवार, अरविंद होले, प्राचार्य डॉ. शुभदा घोलप आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. राहुल बिबवे, प्रा. मनोज वानरे यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)