पुणे – खाते प्रमुख हाजीर हो!

मुख्यसभांना दांडी मारल्यास अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

पुणे – महापालिकेच्या मुख्यसभांना नगरसेवकांकडून पॉईट ऑफ इन्फर्मेशन अंतर्गत शहरातील समस्यांवर प्रश्‍न उपस्थित केले जातात. मात्र, त्यावेळी संबंधित विभाग प्रमुख उपस्थित नसल्याने प्रशासनाकडून नगरसेवकांना उत्तर दिले जात नाही. त्यामुळे नगरसेवकांकडून तसेच महापौरांकडूनही प्रशासनाला धारेवर धरले जात असल्याने या पुढे महापालिकेच्या प्रत्येक विभाग प्रमुखाने मुख्यसभेला उपस्थित राहाणे बंधनकारक असल्याचे आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मंगळवारी झालेल्या मुख्यसभेत अनेक अधिकारी उपस्थित नसल्याने नगरसेवकांच्या प्रश्‍नांना उत्तर देता येत नसल्याने आयुक्तांना सभागृहात दिलगीरी व्यक्त करण्याची वेळ आली होती. त्याची गंभीर दखल घेत, आयुक्तांनी याबाबतचे आदेश तातडीने काढले आहेत. तसेच, या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित विभागप्रमुखांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा, या आदेशात देण्यात आला आहे.

काय आहेत आयुक्तांचे आदेश
1) सर्व खातेप्रमुखांनी बैठकीस पूर्णवेळ उपस्थित राहावे
2) काही अपरिहार्य कारणास्तव उपस्थित राहणे शक्‍य नसल्यास सहायक अधिकारी माहितीसह उपस्थित असावा
3) मुख्यसभा चालू असताना, काही महत्त्वपूर्ण कामासाठी बाहेर जावे लागल्यास महापौर आणि आयुक्तांना पूर्वसूचना देऊनच अधिकाऱ्यांनी बाहेर जावे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)