खातवळचा पाणीप्रश्न तातडीने मार्गी लावू

वडूज : पाणीपुरवठा मंत्री राम शिंदे यांना निवेदन देताना युवा कार्यकर्ते संतोष फडतरे, सुरेंद्र जगताप व इतर.

पाणीपुरवठा मंत्री राम शिंदे यांचे आश्‍वासन

वडूज, दि. 23 (प्रतिनिधी)- खटाव तालुक्‍यातील खातवळ येथील पिण्याच्या पाण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न करून हा प्रश्न तातडीने मार्गी लावू, असे आश्वासन पाणी पुरवठामंत्री राम शिंदे यांनी ग्रामस्थांच्या शिस्टमंडळाला दिले. खातवळच्या नवनिर्वाचित सरपंच सौ. रेखा फडतरे यांच्यावतीने सुरेंद्र जगताप यांनी मुंबई येथे ना. राम शिंदे यांची भेट घेऊन गावच्या सद्यस्थितीतील पाण्याचा टंचाई बाबत निवेदन दिले. निवेदनाची दखल घेऊन मंत्री शिंदे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधून खातवळ पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही होण्यासंदर्भात चर्चा, विचार विनिमय केला. मंत्री राम शिंदे यांनी तातडीने दखल घेतल्याबद्दल ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

-Ads-

 

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)