खाण क्रशर संघटनेने घेतले “त्या’ मुलाचे शैक्षणिक पालकत्व

 तळेगांव-दाभाडे – घरची स्थिती अतिशय बेताची… त्यात डोक्‍यावर मातेचे छत्र हरपलेले… वडील देखील मतीमंद… घर खर्च आणि वडिलांच्या औषधांचा खर्च भागवण्यासाठी घरोघरी दूध वाटण्याचे काम करणाऱ्या राहुल नंदकुमार जाधव याने अशाही स्थितीत 75 टक्‍के गुण मिळवले. तो मावळ तालुक्‍यात माळवाडी येथे राहातो. त्याचे शिक्षण अर्धवट राहू नये, यासाठी मावळ तालुका खाण क्रशर उद्योजक संघाने पुढाकार घेतला आहे. त्याला महिन्याला शे-पाचशे रुपये मिळतात आणि याच पैशातून तो सर्व खर्च भागवण्याचा प्रयन्त करतोय. परंतु शैक्षणिक खर्च परवडत नाही. अध्यक्ष विलास काळोखे व संचालक किरण काकडे यांनी राहुलचे शैक्षणिक पालकत्व स्विकारले आहे.
तालुका व जिल्हा पातळीला यश संपादन करून आता कुस्ती क्षेत्रात राज्य पातळीवर राहुल खेळू इच्छित आहे. शैक्षणिक खर्चाबरोबर कुस्तीतही मदत करण्याचे आश्वासन यावेळी संघटनेने त्याला दिले आहे. मावळ तालुका खान क्रशर उद्योजक संघाचे अध्यक्ष तसेच रोटरी सिटीचे संस्थापक विलास काळोखे, संचालक किरण काकडे, अध्यक्ष नितीन शहा, सुरेश दाभाडे, संजय मेहता, बाळासाहेब रिकामे, बाळासाहेब भेगडे, रोटरॅक्‍ट अध्यक्ष केशव मोहोळ यावेळी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)