खाणसम्राट जनार्दन रेड्डी फरार; पोलीस मागावर 

बंगळूर – कोट्यवधी रूपयांच्या व्यवहाराशी संबंधित पॉन्झी स्किमममध्ये सामील असल्याच्या संशयावरून खाणसम्राट अशी ओळख असणारे कर्नाटकचे माजी मंत्री जी.जनार्दन रेड्डी पोलिसांच्या रडारवर आले आहेत. रेड्डी फरार झाल्याने पोलीस त्यांच्या मागावर आहेत.

बंगळूरचे पोलीस आयुक्त टी.सुनील कुमार यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सेंट्रल क्राईम ब्रॅंचचे (सीसीबी) पोलीस रेड्डी आणि त्यांचा निकटवर्तीय अली खान यांचा शोध घेत असल्याची माहिती दिली. या घडामोडीचे कुठले राजकीय कनेक्‍शन नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गुंतवणूकदारांना अधिक परताव्याचे आमिष दाखवणारी पॉन्झी स्किम चालवणाऱ्या अॅम्बिडन्ट मार्केटिंग प्रा.लि.चा प्रमुख सैद अहमद फरीद याने त्याच्यामागील सक्तवसुली संचालनालयाचा (ईडी) ससेमिरा संपवण्यासाठी रेड्डींना साकडे घातले. त्याला मदत करण्याचे आश्‍वासन रेड्डी यांनी दिले. त्यासाठी दोघांमध्ये 20 कोटी रूपयांचा व्यवहार झाला. खान याच्यामार्फत तो व्यवहार झाला, अशा आरोपाशी संबंधित हे प्रकरण आहे. फरीदने पैसे दिल्याचा दावा केला आहे. त्यावरून आता सीसीबीचे पोलीस रेड्डी आणि खान या दोघांच्या मागावर आहेत. गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून फरीदला याआधी अटक करण्यात आली होती. तो सध्या जामीनावर बाहेर आहे.

मंगळवारीच कर्नाटक पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यानुसार बळ्ळारी लोकसभा मतदारसंघात रेड्डी यांचे निकटतर्वीय असणाऱ्या श्रीरामुलू यांच्या भगिनी जे.शांता (भाजपच्या उमेदवार) यांचा पराभव झाला. बळ्ळारी हा रेड्डी बंधूंचा बालेकिल्ला मानला जातो. कॉंग्रेसने 2004 नंतर प्रथमच तो मतदारसंघ भाजपकडून खेचून घेतला. तो निकाल रेड्डी आणि त्यांच्या कुटूंबीयांसाठी मोठा हादरा मानला जात आहे. त्या निकालाच्या धक्‍क्‍यातून सावरण्याआधीच आता रेड्डी यांच्या पाठीमागे पोलिसांचा ससेमिरा लागला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)