पिंपरी – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाला अखेर 18 वर्षांनी अध्यक्षपद लाभले असून सदाशिव खाडे यांनी आज (शुक्रवारी) अध्यक्षपदाची सूत्रे स्विकारली. ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. या स्वागत सोहळ्याला भाजपच्या जुन्या पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. मात्र, नव्यांनी पाठ फिरवल्याने भाजपमधील खदखद अजूनच अधोरेखीत झाली आहे.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण स्थापनेपासून आजपर्यंत 27 जणांनी अध्यक्षपद भुषविले आहे. त्यातही केवळ सातच वेळा राजकीय व्यक्तींना हे पद भुषविण्याची संधी मिळाली असून उर्वरीत 20 वेळा शासकीय अधिका-यांच्या हातातच प्राधिकरणाची दोरी राहिली आहे. 25 ऑक्टोंबर 2001 ते 22 ऑक्टोंबर 2004 या कालावधीत काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाबासाहेब तापकीर यांनी प्राधिकरणाचे शेवटचे अध्यक्ष म्हणून हे पद उपभोगले. त्यानंतर आजतागायत कोणत्याही राजकीय व्यक्तीला ही खुर्ची लाभलेली नाही. पुणे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली असलेली कार्यकारणीच प्राधिकरणाचा कारभार हाकत होती. अखेर भाजपने पुन्हा एकदा राजकीय अध्यक्ष प्राधिकरणाला दिले आहेत.

त्यानुसार खाडे यांनी आज अध्यक्षपदाची सूत्रे स्विकारली. खासदार अमर साबळे, पक्षनेते एकनाथ पवार, स्वीकृत सदस्य मोरेश्वर शेडगे, माजी नगरसेवक राजू दुर्गे या जुन्यांपैैकी पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. तर नव्यांपैकी स्थायीच्या माजी अध्यक्षा सिमा सावळे वगळता अन्य कोणीही या स्वागत सोहळ्यास उपस्थित राहिले नाही. आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, महापौर राहुल जाधव यांच्यासह नव्यांपैकी अनेक पदाधिकाऱ्यांनी याकडे पाठ फिरवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)