“खाकीतील वक्ता’

प्रशांत जाधव

सातारा – ग्रंथ महोत्सवातील कार्यक्रम असो किवा साहित्य क्षेत्रातील कोणाताही कार्यक्रम याठिकाणी बोलण्यासाठी साहित्यीक मंडळीची वर्दळ असते. मात्र याच गर्दीत सोमवारी एका वेगळ्या चेहऱ्याने सर्वांनाच दाद देण्यास भाग पाडले. आपल्या कामाचा ताण सांभाळत पोलिसही चांगले वक्ते असू शकतात, हे शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दाखवून दिले आहे. ग्रंथमहोत्सवाच्या “इथे घडतात वाचक वक्ते’ या परिसंवादावेळी धुमाळ यांनी केलेल्या छोटेखानी भाषणाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. भाषण सुरू असतानाच सातारकरांनी खाकीतील वक्ता अनुभवल्याची चर्चा शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे नगरीत रंगली होती.

निमीत्त होते सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावर सुरू असलेल्या ग्रंथमहोत्सवाचे. संयोजकांनी “इथे घडतात वाचक वक्ते’ हा परिसंवाद आयोजित केला होता. कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून जेष्ठ लेखक प्रकाश पायगुडे, डॉ. शैलजा माने यांची उपस्थिती होती. तर याच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातील डॉ. शैलजा माने व प्रा. प्रकाश पायगुडे यांनी साहित्य पंढरीतील ज्ञानाचा खजाना उपस्थितांना उपल्बध करून दिला. त्यानंतर पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ मार्गदर्शन करण्यास डायससमोर आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यांनी प्रथमच व्यासपीठाच्या आजुबाजूला उभा राहून काम करणाऱ्या माझ्यासारख्या वर्दीतील माणसाला व्यासपीठावर येण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानत, त्यांच्या भाषणाला सुरूवात केली. दगड गोट्यांचे मानकरी आम्ही, सांगा आमचा काय दोष असतो, कायदा सुव्यवस्थाच राखतो तो, तरीही जनतेचा रोष असतो. या ओळींचा भाषणात समावेश करून त्यांनी या व्यासपीठावर खाकीच्या मनातील खदखद व्यक्त केली. त्याचबरोबर धुमाळ यांनी वाचन संस्कृतीच ही तुमच्या भविष्याचा पाया असल्याचे सांगत, माणसाच्या हातून घडलेल्या चुकांचे त्याला भविष्यात मोठे करतात, असा विश्‍वास व्यक्त केला.

आयुष्यात चांगल्या वाईटातील फरक करण्याचे सामर्थ्य मिळवायचे असेल, तर वाचनाला पर्याय नसल्याचे सांगत त्यांनी साहित्यातील अनेक संदर्भ सहज अन्‌ सोप्या भाषेत सांगितल्याने त्यांचा साहित्याचा असलेल्या अभ्यासाचीच चर्चा सुरू होती. किशोर धुमाळ यांच्या भाषणाने मुलांना, पालकांना व शिक्षकांना प्रॅक्‍टीकली ज्ञान देणारा वक्ता मिळाल्याची चर्चा यावेळी उपस्थितांच्यात सुरु होती. त्यांच्या भाषणाच्या शेवटी तर विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करून खाकीतील या वक्‍त्याचा सन्मान केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)