खाऊच्या पैशातून शाळापयोगी वस्तूंचे वाटप

राजगुरूनगर- खाऊच्या पैशातून वनवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शाळापयोगी वस्तूंचे वाटप नुकतेच करण्यात आले. राजगुरुनगर येथे असलेल्या वनवासी वसतिगृहात एकूण 42 मुले शिक्षण घेतात. त्यांचा खर्च सेवाभावी व्यक्‍ती आणि संस्था करीत आहेत. राक्षेवाडी (ता. खेड) येथील साई मच्छिंद्र राक्षे हिच्या जन्मदिवसानिमिताने जमा झालेल्या रकमेतून येथील वनवासी विद्यार्थ्यांना कंपासपेटी आणि खाऊ वाटप करण्यात आला. त्यांच्या समवेत केक कापून नवा आदर्श निर्माण केला आहे. यावेळी दक्षता समितीच्या सुप्रिया मुळूक, महिला दक्षता व सुरक्षा समितीच्या सदस्या मोहिनी राक्षे, खेड पालक संघाचे अध्यक्ष बी. एस. सांडभोर, उपाध्यक्ष आर. ए. सोनवणे, संदेश नवले, योगिता पवार, अर्चना दडमल, प्रतिक धाडगे, वसतिगृहाचे अधीक्षक अमोल डंबरे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)