खांबाला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू

पिंपरी – विद्युत खांबाला धडकून दुचाकीस्वाराचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.24) सायंकाळी साडे सहा वाजता सांगवी येथील रक्षक चौकातील भारत रेसीडेन्सी कॉलनी गेट समोर घडली.

राजेंद्र अंबादास भोसले (वय-51, रा.लीला निवास, विशालनगर, पिंपळे-निलख) असे या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.24) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास राजेंद्र भोसले हे त्यांच्या दुचाकीवरुन सांगवी येथील रक्षक चौक, भारत रेसीडेन्सी कॉलनी गेट समोरु जात असताना दुचाकीवरील त्यांचा ताबा सुटला व त्यांची दुचाकी रस्त्यावरील एका विद्युत खांबाला जाऊन जोरात धडकली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सांगवी पोलीस तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)