खांदवेनगरची वाहतूक कोंडी

सोडविण्यास ग्रामस्थांचा पुढाकार

वाघोली- वाघोली (ता. हवेली) येथील खांदवे नगर भागात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्याकरिता स्थानिक युवक, नागरिक, समाजसेवी संस्था तसेच पोलिसांच्या योगदानातून प्रयत्न केले जात असल्याने नागरिक तसेच प्रवाशांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
वाघोली येथील आव्हाळवाडी चौक, वाघेश्वर मंदिर चौक, केसनंद फाटा चौक येथे ग्रामस्थ, ग्रामपंचायत, तसेच पोलीस कर्मचारी यासह वॉर्डन यामाध्यमातून वाहतूक समस्या सोडविण्यात आली होती. मात्र, खांदवे नगर भागात वाहतूक कोंडीचा प्रश्‍न कायम होता. जुन्या जकात नाक्‍यापर्यंत दुभाजक नसणे, विरुद्ध दिशेने जाणारी वाहने, महामार्गालगतचे बोर्ड, एमएसईबीचे खांब यासह वाढलेले अतिक्रमण यामुळे वॉर्डन तसेच पोलीस असून देखील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सुटत नव्हता. याकरिता अखेर पोलीस, ग्रामस्थांच्या प्रयत्नातून सायंकाळी 5 ते 8 यावेळीत वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
याबाबत वाघोलीचे माजी उपसरपंच संदीप सातव यांनी सांगितले की, खांदवे नगर परिसरात होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ग्रामस्थांच्या पुढाकाराने कार्य सुरू आहे. तर, पोलीस उपनिरीक्षक अण्णासाहेब टापरे यांनी सांगितले की, वाघोली हद्दीत खांदवे नगर परिसरात सायंकाळी 5 ते 9 या वेळेत वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी जास्तीच्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे तसेच पुणे शहर विमानतळ पोलीस ठाण्याच्या मदतीने रस्ता दुभाजकाची उभारणी करण्यात येणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)