खांडी परिसरातील वीजवाहक तारा व खाबांची दुरुस्ती करण्याची मागणी

टाकवे बुद्रुक –आंदर मावळ मधील अतिदुर्गम भागातील खांड ग्रामपंचायत हद्दीतील बेंदेवाडी, लोहटवाडी, चिरेखानी कुसुर या भागातील काही विजेचे खांब पावसाळ्यात पडले आहेत. परिणामी विद्युत वाहक तारांना आधार राहिलेला नाही. त्यामुळे एखादा जीवघेणा अपघात होण्याची वाट न पाहता या तारा व खांबांची दुरुस्ती करण्याची मागणी आंदर मावळ मनसेच्या वतीने महावितरण कार्यालयाला देण्यात आले आहे.

मावळात पावसाचा जोर अधिक होता. त्यामुळे पावसाळ्यात खांडी परिसरातील वीजवाहक तारा व खांबांची पडझड झाली आहे. पावसाळा संपल्यानंतरही यासाहित्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही या खाबांना असलेल्या वीज वाहक तारा अद्यापही झाडा-झुडुपांना अडल्या असून, त्याच अवस्थेत वीज पुरवठा होत आहे. महावितरणच्या गलथान कारभारामुळे काही दुर्घटना घडु नये, याकरिता तेथील पडलेले पोल पुर्ववत उभे करून वीज प्रवाहक तारा सुरळीत कराव्यात, या मागणीचे निवेदन सहाय्यक मुख्य आभियंता शाम दिवटे यांना आंदर मावळ मनसेच्या वतीने देण्यात आले आहे. येत्या चार पाच दिवसांच्या आत हे काम आम्ही तातडीने चालु करू आसे आश्‍वासन शाम दिवटे यांनी यावेळी दिले
यावेळी आंदर मावळ मनसे संघटक संतोष शंकर मोधळे, वडगाव शहराध्यक्ष गणेश भांगरे, शाखा अध्यक्ष सोमनाथ आडिवळे, आनिल लालगुडे, आशिष म्हाळस्कर, संग्राम भानुसघरे, विकास साबळे, नवनाथ शिवेकर, पोपट हिले आदी मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

What is your reaction?
3 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)