खांडगे स्कूलमध्ये मातृदिन उत्साहात साजरा

तळेगाव दाभाडे येथील मामासाहेब खांडगे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये मातृदिन साजरा करण्यात आला. दरवर्षी शाळेमध्ये माता पालकांना बोलावून त्याच्या समवेत मातृदिन साजरा केला जातो. यावर्षी भारत माता हिच आपली प्रथम माता आहे हा संदेश विद्यार्थांना देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

कार्यकमाची सुरवात भारतमाता प्रतिमा पूजनाने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी भारताच्या नकाशाच्या प्रतिकृतीतून विविध राष्ट्रातील स्वातंत्र्यवीरांच्या प्रतिनिधित्वाची भूमिका साकारून त्यांच्या विषयी माहिती दिली. रसिका वशिष्ट यांनी विद्यार्थांना भारतभूमी विषयी माहिती दिली. आर्या ठाकूर, अदिती दोबरे ,आयुशी पटेल, मेहूर मोहम्मद यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. सहावीत विद्यार्थिनींनी आई विषयी असलेली प्रेमभावना व्यक्त करणारे नृत्य सादर केले. या विद्यार्थ्थिनींना रेखा नंदगवळी यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थांना “वंदे मातरम’ या गीताचा अर्थ सावित्री पत्की यांनी समजून सांगितला.

शाळेचा मुख्याध्यापिका प्रणाली गुरव यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. आपल्या भारतभूमीच्या रक्षणासाठी आपण आपल्या आजूबाजूला असलेले प्रदूषण अस्वच्छता यांसारख्या शत्रूचा नाश करण्याचा संदेश त्यांनी विद्यार्थांना दिला. कार्यक्रमाचे संयोजन प्रणाली तारे, वीणा विश्‍वकर्मा, नम्रता परदेशी यांनी केले तर सूत्रसंचालन दीक्षा त्रिपाठी यांनी केले. इतर शिक्षक वर्ग व कर्मचारी वर्गाने सहकार्य केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)