खांडगे स्कूलच्या विद्यार्थ्यांचा पानशेत मावळ साहसी उद्यानात निवासी कॅम्प

तळेगाव दाभाडे – येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित मामासाहेब खांडगे इंग्लिश मीडियमच्या “स्काऊट गाईड’ विद्यार्थ्यांचा पानशेत मावळ “साहसी उद्यानात’ तीन दिवसीय निवासी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.
शाळेतील “स्काऊट गाईड’ या उपक्रमांतर्गत इयत्ता आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग होता. स्वावलंबन, व्यक्तिमत्त्व विकास, साहसीवृत्ती, परस्परांना सहकार्य व निसर्ग प्रेम वाढवण्याच्या हेतूने या कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.

कॅम्पच्या पहिल्या दिवसाची सुरवात सिंहगड किल्ल्यावर चढण्याच्या सफरीने करण्यात आली. या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणाली गुरव व पूर्व प्राथमिक विभागाच्या प्रमुख अपर्णा टेकवडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गडावर विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियान हाती घेतले. सत्यम डावखरे याने “गड आला पण सिंह गेला’ हा पोवाडा सादर केला. विद्यार्थ्यांना साहसी खेळाचे महत्त्व व प्रसंगावधान यांचे प्रशिक्षण देण्यात आले.

-Ads-

विद्यार्थ्यांनी झिप लाईन, बुर्मा ब्रिज यांसारख्या साहसी खेळांचा आनंद लुटला तसेच विद्यार्थ्यांनी रात्री “कॅम्प फायर’चा सुद्धा अनुभव घेतला. या वेळी विद्यार्थ्यांनी जनसेवा फाऊंडेशन वृद्धाश्रमास भेट दिली. तेथील आजी-आजोबासोबत गप्पागोष्टी करून त्यांचे मनोरंजन केले. “कॅम्प’चे आयोजन यशश्री आलम व सुनेत्रा पाठक, सुशील खंडागळे यांनी केले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)