खांडगे शाळेत रंगला रास-गरबा

तळेगाव-दाभाडे – मामासाहेब खांडगे इंग्लिश मेडीयम स्कूलमध्ये कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी शाळेत भोंडला, रास दांडिया व गरब्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात दुर्गा पूजनाने करून रेणुका रत्नालीकर यांनी विद्यार्थांना दुर्गा देवीची महती सांगितली. सर्व विद्यार्थी र्व शिक्षिकांनी पारंपरिक गरब्याचे पोशाख परिधान केले होते.विद्यार्थीनींनी फेर धरून गज पूजन करून भोंडल्याची गीते म्हणत भोंडला साजरा केला. मुख्याध्यापिका प्रणाली गुरव, समन्वयक धनश्री डंबे, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख अपर्णा टेकवडे यांच्या हस्ते विजेत्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. उत्कृष्ट वेशभूषा व नृत्य सादरकर्ते विद्यार्थी -स्वरा गायकवाड, सार्थक लोंढे, श्रेया प्रजापती, तनिष्क पडवळ, पूर्वा झगडे, प्रीत चोटालिया यांना पारितोषिक देण्यात आली. तसेच उत्कृष्ट वेशभूषा व नृत्य सादरकर्ते शिक्षक म्हणून स्नेहल सातकर, वीणा विश्‍वकर्मा, नम्रता परदेशी यांना देण्यात आली.
रेखा नंदगवळी व शिक्षक व कर्मचारी यांनी कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)