खशोगी हत्येमागील सत्य ट्रम्प लपवत आहेत

हिलरी क्‍लिंटन यांचा आरोप

वॉशिंग्टन – सौदीचे पत्रकार जमाल खशोगी यांच्या हत्येमागील सत्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लपवत आहेत, असा आरोप डेमोक्रेटिक पक्षाच्या अध्यक्षीय पदाच्या उमेदवार हिलरी क्‍लिंटन यांनी केला आहे. ट्रम्प खशोगींच्या मृत्यू प्रकरणाला जाणीवपूर्वक ‘कव्हर-अप’ करत आहेत असे हिलरी म्हणाल्या. ट्रम्प आणि त्यांच्याजवळील काही लोक स्वत:च्या आर्थिक स्वार्थापोटी खशोगी यांच्या हत्येमागील सत्य लपवत आहेत, खशोगींच्या हत्येची सौदीचे राजे मोहंमद बिन सलमान यांना पूर्वकल्पना होती, असे वक्तव्य ट्रम्प यांनी 20 नोव्हेंबर रोजी केले होते.

-Ads-

या प्रकरणानंतरही अमेरिकेचे रियाधसोबतचे संबंध तसेच राहतील, असेही ट्रम्प म्हणाले होते, त्या संदर्भाने क्‍लिंटन यांनी हा आरोप केला आहे. 2 ऑक्‍टोबर रोजी सौदीच्या दुतावासामध्ये खशोग्गी यांची हत्या करण्यात आली होती. खशोगी यांच्या हत्येमागे सौदीच्या राजघराणे आणि राजे सलमान यांचा हात नाही, असे सौदीकडून सांगण्यात आले होते. खशोगी यांच्या हत्येमागे राजे मोहंमद बिन सलमान यांचा हात असल्याचा ट्रम्प यांचा आरोप सौदीकडून फेटाळण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)