खशोगी हत्या ऑडियो टेप ऐकणार नाही : डोनॉल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन (अमेरिका) – खशोगी हत्या ऑडियो टेप न ऐकण्याचा निर्णय अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनी जाहीर केला आहे. तुर्कीची राजधानी इस्तंबूलमध्ये झालेल्या पत्रकार जमाल खशोगी त्यांच्या निर्घृण हत्येसंबंधी सर्व माहिती मला देण्यात आली आहे. मग ती ऑडियो टेप ऐकण्याचे मला काही कारण आहे का? असा प्रश्‍न त्यांनी लोकांना विचारला आहे. ती एक
वेदनादायी आणि काळजाला घरे पाडणारी ऑडियो टेप असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तैयप एर्दोगन यांनी खशोगी हत्याकांडाचे रेकॉर्डिंग फ्रान्स, अमेरिका, ब्रिटन आणि अन्य देशांना पाठवल्याची माहिती नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच दिली होती.वॉशिंग़्टन पोस्ट या अमेरिकन वृत्तपत्राचे पत्रकार जमाल खशोगी सौदी अरबच्या धोरणांचे कठोर टीकाकार होते. दोन ऑक्‍टोबर रोजी आपल्याविवाहासंबंधी दस्तावेजाच्या पूर्ततेसाठी ते इस्तंबूलमध्यील सौदीच्या दूतावासात गेले होते. त्यानंतर ते गायब झाले. सुरुवातीला सौदीने खाशोगींच्या गायब होण्यासंबंधी आपणास काही माहिती नसल्याची भूमिका घेतली होती. मात्र नंतर सौदी दूतावासात खशोगींची हत्या झाल्याचे त्यांनी मान्य केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)