खशोगीची हत्या पूर्वनियोजितच-सौदी अरबची कबुली 

दुबई – इस्तंबूलमधील सौदी अरबच्या दूतावासात झालेली पत्रकार जमाल खशोगी याची हत्या पूर्वनियोजितच होती अशी कबुली सौदी अरबने प्रथमच दिली आहे. आजवर खशोगीच्या गायब होण्याशी आपला काहीही संबंध नाही अशी भूमिका सौदीने घेतली होती. नंतर दूतावासात झालेल्या झगड्यात खशोगी मारला गेला असा खुलासा सौदीने केला होता.

खशोगीच्या हत्येचा आदेश कोणी दिला आणि त्याच्या मृतदेहाचे काय केले या प्रश्‍नांची उत्तरे सौदी अरबने दिली नसल्याचे तुर्कीने म्हटले आहे. खशोगीच्या गायब होण्यामुळे संपूर्ण जगभर खळबळ माजली होती. तुर्की आणि सौदी अरबचे पाश्‍चिमात्य सहयोगी यांनी खशोगीच्या गायब होण्याबाबत रियाधवर संशय व्यक्त केला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

खशोगीची हत्या पूर्वनियोजित असल्याचे सौदीच्या सरकारी टेलिव्हिजनने सौदीच्या सरकारी वकिलाच्या हवाल्याने गुरुवारी म्हटले आहे. तुर्की-सौदीच्या संयुक्त कार्यदलाने दिलेल्या माहितीच्या आधारे संशयितांचा तपास चालू असल्याचे सांगण्यात आले आहे. सौदीच्या युवराजांनी या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारावी, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनी एक दिवस अगोदर म्हटले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)