खवैय्यांसाठी भैरवी प्युअर व्हेज

श्रावणी कबाब, बिर्याणी महोत्सव

श्रावण महिना म्हणजे उपासतापास, नेमधर्म आणि शाकाहारी भोजन घेण्याचा महिना. साधारण असंच समीकरण असतं श्रावणाचं. पण तरीही बऱ्याचशा खवैय्यांना मध्येच काहीतरी चमचमीत खाण्याची इच्छा होतेच. अशाच रसिक खवैय्यांसाठी भैरवी प्युअर व्हेजमध्ये सुरू झालाय खास श्रावणातला कबाब आणि बिर्याणी महोत्सव.

पुण्यातील बाणेर येथे असलेल्या भैरवी प्युअर व्हेजमध्ये नुकताच हा महोत्सव सुरू झाला. या महोत्सवाच्या शुभारंभप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते अतुल कुलकर्णी, विखे पाटील फाउंडेशनचे संस्थापक डॉ. अशोक विखे पाटील आणि बाणेरचे माजी नगरसेवक श्री. ज्ञानेश्‍वर तापकीर उपस्थित होते. 14 ऑगस्ट ते 9 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणाऱ्या या महोत्सवामध्ये अनेक लज्जतदार पदार्थांची रेलचेल असणार आहे. रेड व्हेज सुरमई, क्रमी मस्टर्ड पनीर, पनीर मोझरेला व्हर्मिसेली कबाब, रेड ब्रॉकोली टिक्का, बीटरूट सीख कबाब, कच्छी बिर्याणी, बीअरी बिर्याणी, कंदाहारी बिर्याणी, अंबुर बिर्याणी, थालासेरी बिर्याणी, नासी केबुली बिर्याणी,नागपुरी सावजी बिर्याणी यांसारख्या कबाब आणि बिर्याणीची चव खवैय्यांना तिथे चाखता येईल.

स्वरा ग्रुप्सचा एक भाग असलेले भैरवी प्युअर व्हेज हे आयएसओ प्रमाणपत्र प्राप्त करणारे पुण्यातील पहिले रेस्टरॉंट आहे. भैरवी प्युअर व्हेजतर्फे दरवर्षी सिझलर महोत्सव, श्रावण कबाब व बिर्याणी महोत्सव आणि आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थ महोत्सव अशा 3-4 खाद्यमहोत्सवांचे आयोजन केले जाते. याच उद्योगसमूहाच्या मल्हारमाची हॉलिडे रिसॉर्ट व जलसृष्टी आयलंड रिसॉर्ट येथील बाहेरगावचे पर्यटक तसेच बाणेर येथील देशी अरोमाचे नियमित ग्राहकही या महोत्सवाला आवर्जून भेट देतात.
विशेष म्हणजे महोत्सवात येणाऱ्या ग्राहकांना एखादी भेटवस्तू देणे ही भैरवीची आणखी एक खासियत आहे आणि यावर्षी ते बेलाची रोपं (झाडे लावा, झाडे जगवा) भेट म्हणून देत आहेत.

भैरवी प्युअर व्हेजचा हा कबाब आणि बिर्याणी महोत्सव महोत्सव 9 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार असून, सकाळी 11 ते 3 आणि संध्याकाळी 7 ते 11 या वेळात रसिक खवैय्यांना तेथील पदार्थांचा आस्वाद घेता येईल. श्री. रामदास मुरकुटे, श्री. विश्‍वास मुरकुटे, श्री. राहुल मुरकुटे, सागर मुरकुटे आणि रोहन मुरकुटे तसेच फेस्टिव्हल भरवणारे चेफ आदित्य परांजपे, गुणवंत तेलगोटे, सुभाष गावडे व जनरल मॅनेजर दिपक नावंदे आणि भैरवी टीम हे या खाद्योत्सवासाठी पुणेकरांचे स्वागत करण्यास उत्सुक आहेत.

तर अशा या कबाब आणि बिर्याणी महोत्सवाला एकदा तरी भेट द्यायलाच हवी!


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)