खळद शाळेची जुनी इमारत धोकादायक

तीन वर्षांपूर्वी पाठविला होता प्रस्ताव

खळद- खळद (ता. पुरंदर) येथे जिल्हा परिषद शाळेची जुनी इमारत अतिशय धोकादायक झाली आहे. त्यामुळे इमारत पाडून नवीन इमारत बांधण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडे तीन वर्षांपूर्वी प्रस्ताव पाठविला होता. तरीही अद्याप यासाठी मंजूरी मिळाली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
सध्या या धोकादायक इमारतीच्या बाजूलाच अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळेसाठी नवीन इमारत बांधण्यात आल्यामुळे जुनी इमारत वापरात नाही. मात्र, याच परिसरात 82 मुलांचा दिवसभर वावर असतो. त्यामुळे धोकादायक इमारत जर पडली तर यातून मोठी हानी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.
याबाबत माजी उपसरपंच सुरेश रासकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, आम्ही आमच्या मासिक बैठकीमध्ये ही इमारत पाडण्यात यावी यासाठीचा ठराव केला होता. तसेच जिल्हा परिषद शाळेचे पत्र घेऊन पुढे पत्रव्यवहार केला होता. शाळेच्या मुख्याध्यापक अलका रासकर यांनी सांगितले की, इमारत पाडण्यात यावी यासाठी पूर्वीच्या मुख्याध्यापकांनी पत्रव्यवहार केला असला तरीही आम्ही पुन्हा तातडीने शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन पुन्हा प्रस्ताव पाठवू.

  • अशी पाडली जाते धोकादायक इमारत
    इमारत पाडण्यासाठी सुरुवातीला शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत प्रशासनाचे पत्र घेऊन मुख्याध्यापक पंचायत समितीला हा अहवाल पाठवितात. त्यानंतर पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे अधिकारी येऊन इमारत खरोखरच धोकादायक आहे की नाही? याची पाहणी करतात व त्यानंतर इमारत पाडण्यासाठी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठविला जातो. जिल्हा परिषदेने परवानगी दिल्यानंतर इमारत पाडली जाते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)