खळद येथे माजी सैनिकांचा गौरव

गराडे- पुरंदर तालुका भाजपाच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त जय जवान जय किसानचा नारा देत भिवडी (ता. पुरंदर) गावातील माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष आर. एन. जगताप, भाजपाच्या पुरंदर तालुका महिला आघाडीच्या प्रमुख अलका शिंदे, अमोल जगताप, सिद्धार्थ पोरे, श्रीकांत थिटे, अक्षय भांडवळकर, अविनाश वाईकर, विकास भांडवलकर, बाळासाहेब चव्हाण, कुमार न्हालवे, प्रसाद अत्रे, अशोक खोमणे आदी उपस्थित होते. कॅप्टन ज्ञानोबा बाबूराव भिंताडे, महादेव देवबा दिघे, मधुकर गेनबा गायकवाड, अर्जुन भिमाजी खटाट, पंढरीनाथ साधू भिंताडे, रविराज तानाजी भिंताडे, मिलिंद संजय मोकाशी, हेमंत मधुकर गायकवाड, जगदीश जयवंतराव पवार, स्वप्नील मोहन मोकाशी, प्रकाश नाना भामे आदी माजी सैनिकांचा गौरव करण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)