खळद परीसरात संमिश्र प्रतिसाद

खळद- खळद परिसरात मतदान करण्यासाठी सकाळीपासून मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. खळद, शिवरी, वाळुंज, निळुंज परिसरात दुपारी बारा वाजेपर्यंत मतदारांनी रांगेमध्ये उभे राहून मतदान केले. त्यानंतर उन्हामुळे सगळ्याच मतदान केंद्रावर शुकशुकाट पाहवयास मिळाला. दुपारी साडेतीन नंतर जास्तीत जास्त मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांना पळापळ करावी लागली. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या युवा मतदारांच्यात उसाह दिसत होता. पुरंदर तालुक्‍यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधित गावातील कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, पारगाव या गावातील नागरिकांचा मतदानास समिश्र प्रतिसाद पाहावयास मिळाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)