खळद परिसरात पावसाअभावी पिके धोक्‍यात

खळद- पुरंदर तालुक्‍याकडे पावसाने पाठ फिरवल्यामुळे खळद समवेत अन्य गावांतील खरीप हंगाम धोक्‍यात आला आहे. सध्या वाटाणा, भुईमूग, बाजरी, मूग, मटकी, सोयाबीन यासारखी केवळ पावसावर अवलंबुन असणारी पिके आता जळू लागली आहेत. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरला जाताना माऊलींसोबत पाऊस येतो अशी या भागातील नागरिकांची धारणा आहे. पण यंदा माऊलींची पालखी पुन्हा आळंदीत पोहचली तरी पण पाऊस पडला नाही. आषाढ महिनाही कोरडा गेल्यामुळे खळद, शिवरी, वाळुंज, निळुंज परिसरातील शेतातील पिके जळू लागली आहेत. अजून काही दिवस जर पाऊस पडला नाही तर हातात आलेली पिके जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
यावर्षी एक-दोन मोठे पाऊस सोडले तर अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. ओढे, नाले कोरडे पडले आहेत. अशी परिस्थिती असताना काही शेतकरी थोड्याफार पाण्यावर बागायती पिके घेताना दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)