खळदला भरली ताणमुक्त अभ्यास कार्यशाळा

खळद- शालेय शिक्षण घेत असताना मुलांनी ताणमुक्त अभ्यास करीत, आत्मविश्वास वाढवून मेंदूचा विकास कसा करायचा याविषयी मार्गदर्शन करणारी ताणमुक्त अभ्यास कार्यशाळा खळद (ता. पुरंदर) येथे संपन्न झाली. ग्रामस्थ व आम्ही खळदकर संस्थेच्या वतीने लोणावळा येथील मनशक्ती प्रयोग केंद्राच्या वतीने ताणमुक्त अभ्यास यश कार्यशाळा व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन शिवशंभो विद्यालयात करण्यात आले होते. यावेळी परिसरातील मुलांनी आणि पालकांनी एकाच वेळी या शिबिराचा अनुभव घेतला. यावेळी लोणावळा मनशक्ती केंद्राचे साधक मनीष शिंदे यांनी मुलांना मार्गदर्शन केले. कृष्णकांत केंगार यांनी गणित तर वसंत गवळे यांनी विज्ञान विषयाचे मार्गदर्शन केले. यावेळी राजेश कादबाने, अशोक खळदकर, भारत आबनावे, अनिल कांबळे यांच्यासह शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)