खळदच्या सेंट जोसेफ स्कूलच्या फी वाढीला स्थगिती

संग्रहित फोटो

सासवड- खळद (ता. पुरंदर) येथील सेंट जोसेफ इंग्लिश स्कूल व्यवस्थापनाने 2018 -19 च्या शैक्षणिक वर्षांपासून 10 टक्के फी वाढ, पालक शिक्षक संघाचे परवानगी शिवाय मनमानी पद्धतीने केली होती. या फी वाढी विरोधात शिक्षणाधिकारी, शिक्षण आयुक्‍तांकडे पालक शिक्षक संघाने दाद मागितली होती. शिक्षण उपसंचालक पुणे विभाग यांनी शाळेस कोणत्याही प्रकारे फी वाढ करू नये, त्याबाबत पालक व विद्यार्थ्यांवर सक्‍ती करू नये, अन्यथा नियमानुसार प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असे कळविले आहे त्यामुळे पालक शिक्षक संघाचे लढ्यास यश आले आहे.
फी वाढीबाबत पालक शिक्षक संघाने वारंवार अर्ज केले होते. त्या अर्जांची दखल घेत जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि. 26) शाळेस भेट दिली व चौकशी केली, त्याचा अहवाल 15 दिवसांत प्राप्त होणार आहे. या शाळेने शाळेत शिकत असलेल्या 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकडून एलसी व मार्कलिस्टसाठी प्रत्येकी 2 हजार रुपये घेतले असल्याचे आढळून आले हे 2 हजार रुपये त्वरित परत करावेत असे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी प्राचार्य व शालव्यवस्थापनास दिले असल्याने पालक शिक्षक संघाकडून त्याचे अभिनंदन करणेत आले. आता शाळा सुरू होऊन एक महिना होऊनही सही वर्गाना काही विषयाला शिक्षक उपलब्ध नाहीत. याबद्दल पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शाळेत चाललेल्या या गैरकारभाराची सखोल चौकशी शिक्षण विभागाकडून होईन व विद्यार्थ्यांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा शिक्षक पालक संघाचे प्रतिनिधींनी व्यक्‍त केली

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)