खळदच्या महिलांचा रायगड किल्ल्‌यावर अभ्यास दौरा

खळद- खळद (ता. पुरंदर) येथील विविध बचत गटांच्या महिलांनी मंगळवारी रायगड किल्ल्यावर अभ्यास दौऱ्यानिमित्ताने भेट देऊन स्वराज्याची राजधानी असणाऱ्या या किल्ल्याची पाहणी केली.
यावेळी या ठिकाणी सुरुवातीला महाराजांच्या राण्यांसाठी असणारे महाल, या ठिकाणी असणारी सव्च्छतागृहाची व्यवस्था, जलाशय, पाणी आडवा-पाणी जिरवा ही तत्कालीन राबवलेली संकल्पना, किल्ल्यावर चालणाऱ्या राज्यकारभाराची व्यवस्था, अष्टप्रधान मंडळाची दालने, धान्याचे कोठार, हिरकणी बुरूज, टकमक टोक, मुख्य प्रवेशद्वार, सदर, जगदिश्वराचे मंदिर,बाजारपेठ, होळीचा माळ, राज्याभिषेक महाल, महाराजांची समाधी, वाघ्या कुत्र्याची समाधी, त्याचप्रमाणे या गडाची निर्मिती करणारा हिरोजी इंदलकर यांच्या नावाची पायरी… अशा सर्व गोष्टींची पाहणी केली.
किल्ला सोडताना येथील प्रत्येक महिलेने या ठिकाणची माती ही आपल्या सोबत घेतली. येताना-जाताना झालेली रोप-वेची सुविधा हा एक वेगळा अनुभव देखील या महिलांना पाहायला मिळाला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी चारशे वर्षांपूर्वी पाणी आडवा पाणी जिरवा, बंदिस्त गटार योजना, स्वच्छतागृहे यांसारख्या किल्ल्यावर राबविलेल्या विविध योजना आजही आपण प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे, असे शिवमणी महिला बचत गटाच्या सदस्या नलिनी कामथे यांनी यावेळी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)