खलील अहमदला दंड

भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान झालेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने केलेल्या 377 धावांचा पाठलाग करताना विंडीजच्या संघाला केवळ 153 धावांपर्यंत मजल मारता आली. यावेळी भारताचा नवोदित वेगवान गोलंदाज खलिल अहमदने विंडीजच्या तीन महत्वपूर्ण फलंदाजांना बाद करत विजयात सिंहाचा वाटा उचलला. मात्र, यावेळी खालीलने सॅम्युअल्सला बाद केल्यानंतर केलेल्या सिलेब्रेशनमुळे त्याला मोठा दंड ठोठावण्यात आला आहे.

खलीलने या सामन्यात वेस्ट इंडिजच्या मार्लोन सॅम्युअल्सला बाद केले. त्यानंतर खलीलने या विकेटचे जोरदार सेलिब्रेशन केले. पण हे सेलिब्रेशन करत असताना त्याने एक शिवी हासडली. त्याचबरोबर मोठ्यामोठ्याने तो बरेच काही बोलत होता. हा त्याचा व्यवहार क्रिकेट या खेळासाठी चांगला नव्हता. खलीलच्या या गोष्टीची दखल आयसीसीने घेतली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी सामन्यानंतर खलीलला बोलवून घेतले. जे काही मैदानात घडले आणि ते खेळाला कसे साजेसे नाही, हे खलीलला ब्रॉड यांनी सांगितले. यावेळी खलीलने आपली चुक मान्य केली आहे. आयसीसीने यावेळी ‘लेव्हल-1’नुसार खलीलला दोषी ठरवले आहे. त्याचबरोबर त्याला एक डिमेरिट गुणही दिला आहे. ब्रॉड यांनी खलीलला यावेळी ताकिदही दिली आहे. खलील या चुकीमुळे दंडही भरावा लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)