खलिस्तान चळवळीला इंग्लंडच्या डाव्या पक्षांचा पाठिंबा

लंडन – लंडन येथिल ट्रफलगार गार्डन येथे रविवारी सिख्स फॉर जस्टीस या अमेरिका स्थीत संघटनेने आयोजीत केलेल्या स्वतंत्र खलिस्तान चळवळीसाठीच्या आयोजीत समारोहाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. सदर कार्यक्रमाला भारताने विरोध दर्शवला होता हे विशेष.

या सोहळ्याचे समर्थन करताना ग्रीन पार्टीचे सहयोगी नेते कॅरोलिन लुकास म्हणाले की, शीख लोकांना त्यांच्या मागण्या मांडण्याचा अधिकार आहे. त्यांच्या मागण्यांमध्ये स्वतंत्र पंजाबची मागणी असली तरी ही मागणी ते करु शकतात. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, मी या सोहळ्यास उपस्थित रहाणाऱ्या व स्वतंत्र्य खलिस्तानची मागणी करणाऱ्या सर्व जगभरातील व्यक्तींच्या बाजुने उभा आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

इंग्लंडच्या तर्फे प्रथमच या मुद्‌द्‌याला अनुसरून एखाद्या खासदाराने आपले मत व्यक्त केले आहे. मात्र इंग्लंडच्या सरकारने या कार्यक्रमाबद्दल आपले कोणतेही मत प्रदर्शन केलेले नाही. या कार्यक्रमाच्या अनुशंगाने मागच्या महिण्यात इंग्लंड सरकारच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, इंग्लंड मधिल नागरीकांना कायद्याच्या चौकटीत राहुन आपले विचार मांडण्याचा आणि त्या विचारांच्या अनुसराने कार्यक्रम आयोजीत करण्याचा अधिकार असून त्यांच्या अधिकारा बाबत आम्ही कोणतेही अवहेलना करणार नाहीत.

या कार्यक्रमा संदर्भात जुलै महिण्यात भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आपला विरोध दर्शवताना इंग्लंड सरकार अश्‍या कोणत्याही कार्यक्रमाला परवानगी देणार नाही असा आम्हाला विश्‍वास आहे. अश्‍या प्रकारचे कार्यक्रम एखादा समुह भारत आणि इंग्लंड दरम्यान असलेले द्विपक्षीय संबंध बिघडवण्याच्या दृष्टीने द्वेश पसरवण्याच्या हेतूने आयोजीत करतो आहे.
या संदर्भात बोलताना आयोजक परमजीत सिंग पाममा आणि ब्रिटनमधील खालिस्तानचा कार्यकर्ता परमजीत सिंग पाटील म्हणाले की, भारतातील पंजाब राज्याला स्वतंत्र खलिस्तान म्हणुन घोषीत करण्यात यावे याची जनजागृती करण्यासाठी ही रॅली आयोजीत केली आहे.

पंजाबला स्वातंत्र्य मिळावा हा निर्णय या कार्यक्रमात घेण्यात आला असून या कार्यक्रमाला इंग्लंड मधिल खासदारांनी पाठिंबा देणे हे येथिल शीख समुदायाचे यश आहे, ज्यांनी आपल्या आपल्या क्षेत्रातील खासदारांना 47,000 हून अधिक ईमेल पाठविल्या आणि त्यांना लंडन जाहीरनामास पाठिंबा देण्यास सांगितले व भारताच्या हस्तक्षेपाचा विरोध केला. तसेच येथिल पहिल्या महिला शीख खासदार प्रीत कौर गिल म्हणाल्या की, सुरक्षित पणे आणि शांततेत आपल्या मागण्या मांडणाऱ्यांच्या या कार्यक्रमाला माझा पाठिंबा असून मागण्या करणाऱ्यांनी आपल्या मागण्यांच्या संदर्भात खबरदारी घ्यावी कारण या मागण्यांनी प्रभावीत झालेल्या अणेक नवतरुणांना भारतीय सरकारने बंदी केलेले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)