खलिस्तानवाद्याचा शोध घेण्यासाठी एटीएसचे पथक दिल्लीत

पुणे – खलिस्तानवादी चळवळीशी संबंधित असल्याचे पार्श्वभूमीवर हरपालसिंग प्रतापसिंग नाईक (मु. रा. पंजाब) यास दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली होती. त्याच्याकडे केलेल्या चौकशी दरम्यान, त्याचा साथीदार मोईन खान (रा. पंजाब) याचा गुन्ह्यात सहभाग आढळून आल्याने एटीएसचे पथकाने 24 डिसेंबर रोजी खान याला ताब्यात घेतले. मंगळवारी खान याची पोलीस कोठडीची मुदत संपुष्टात आल्यानंतर त्यास एटीएसने अतिरिक्त सत्र न्यायाधीश किशोर वढणे यांचे न्यायालयात हजर करत, दिल्ली येथे तपासाकरिता एक पथक गेले असल्याने आरोपीचा पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवत न्यायालयीन कोठडीची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने आरोपीस न्यायालयीन कोठडी मंजूर केली आहे.

हरपालसिंग व मोईन खान हे सोशल मीडियाच्या माध्यमातून खलिस्तानवादी चळवळीत सक्रिय आहेत. वेगवेगळ्या 20 देशातील लोकांशीही ते संर्पकात असल्याचे आणि बनावट नावाने फेसबुक खाती असल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले आहे. खलिस्तान निर्मितीकरिता तुरुंगातील आरोपी सोडविण्याची तयारी, हत्यारे गोळा करण्याची तयारी त्यांनी केल्याचे सोशल मीडिया आणि मोबाइलच्या विश्‍लेषणातून समोर आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आरोपींचा एक सक्रिय साथीदार गुरुजीत निज्जर (सायप्रस देश) हा एटीएसला निष्पन्न झाला असून त्याच्या विरोधात सबळ पुरावे गोळा केले जात आहेत. हरपालसिंग आणि मोईन खान यांचे सोशल मीडिया आणि मोबाइल डाटामधील माहितीचे विश्‍लेषण करण्यात येत असून त्याआधारे नवीन धागेदोरे हाती लागण्याची शक्‍यता आहे. या दोघांशी संबंधित असलेला दिल्ली येथील साथीदाराचा शोध घेण्याकरिता एटीएसचे एक पथक दिल्लीत गेले असून त्यांच्या हाती महत्त्वपूर्ण माहिती लागल्यास आरोपीची पुन्हा पोलीस कोठडी घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)