खलिस्तानवाद्यांच्या मदतीसाठी पाकिस्तानची के-2 योजना 

न्यूयॉर्क (अमेरिका): खलिस्तानवाद्यांच्या मदतीसाठी पाकिस्तानची के-2 योजना तयार असल्याचे सांगण्यात आले आहे. पाकिस्तान सरकार आणि खलिस्तानची मागणी करणारी शीख संघटना यांच्यात संबंध असल्याचे उघड झाले आहे. खलिस्तान समर्थक शीख संघटनेने पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद यांच्याकडे आपल्या कार्यक्रमासाठी पाकिस्तानची मदत मागितली आहे.

अमेरिकेतील एसएफजे (सिख फॉर जस्टिस) या संघटनेचे कायदेशीर सल्लागार गुरुपतवंत सिंह पानून यांनी कुरेशी यांना लिहिलेल्या पत्रात एक लाख शिखांना व्हिसा जारी करण्यासाची विनंती केली आहे. एसएफजे गुरु नानक प्रकाश उत्सवासाठी पाकिस्तानला जाणाऱ्या एक लाख शिखांच्या प्रवासाचा आणि राहण्या-जेवण्याचा खर्च करणार आहे.

शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू नानक देव यांचा जन्म आणि मृत्यू दोन्ही लाहोरजवळच्या नानकान येथे झाला . गुरू नानक यांची जयंती नानक प्रकाश उत्सव म्हणून साजरी केली जाते. या वर्षीचा गुरू नानक प्रकाशोत्सव हा 550 वा प्रकाशोत्सव आहे. यासाठी जगभरातून येणाऱ्या सुमारे 1 लाख शीख भाविकांचा प्रवास व राहण्याजेवणाचा खर्च एसएफजे करणार असून त्याच्या माध्यमातून खलिस्तानचा प्रसार करणार आहे. त्यासाठीच एसएफजे ने पाकिस्तान सरकारकडे एक लाख शिखांना व्हिसा देण्याची विनंती केलेली आहे.

अशा प्रकारे लोकांच्या धार्मिक भावनांना हात घालून खलिस्तानवादी आपला प्रसार करत आहेत. वरकरणी एसएफजे मानवाधिकाराचे काम करत असते. आणि पंजाबसाठी सार्वमत (रेफरेंडम) 2020 मोहीम चालवत असते. लंडनमधील रेफरेंडम 2020 रॅलीनंतर, जी यशस्वी झाली नाही, भारतीय सुरक्षा एजन्सीजनी एसएफजेवर बारीक नजर ठेवणे सुरू केले आहे.

रेफरेंडम 2020 साठी पाक्‍स्तिान आर्थिक आणि अन्य प्रकारचीही मदत करत असल्याचे दिसून आलेले आहे.
गुरुपतवंत पानून हे पाकिस्तानच्या हातचे बाहुले बनले असल्याचा आरोप लंडनमधील शीख फुटीरवादी दल खालसाचे प्रमुख जसवंत सिंह ठेकेदार यांनी आरोप केलेला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)