खलिस्तानवादी दहशतवादी मिंटूचे तुरूंगात निधन 

पतियाळा – खलिस्तानवादी दहशतवादी हरमिंदरसिंग मिंटू याचे आज येथील तुरूंगात हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. तो खलिस्तानी लिबरेशन फोर्सचा (केएलएफ) प्रमुख होता. वयाच्या पन्नाशीत असणाऱ्या मिंटूला पतियाळा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. तिथे हृदयविकाराच्या झटका आल्याने त्याला सरकारी रूग्णालयात हलवण्यात आले. मात्र, रूग्णालयात पोहचण्यापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे डॉक्‍टरांनी स्पष्ट केले.

मलेशियाहून परतलेल्या मिंटूला 2014 मध्ये दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आली. त्याने 28 नोव्हेंबर 2016 ला नाभा तुरूंगातून इतर पाच कैद्यांसमवेत पलायन केले होते. मात्र, त्याला पुढच्याच दिवशी दिल्लीतील रेल्वे स्थानकावर पकडण्यात आले. पोलिसांचा गणवेष घालून आलेल्या एका सशस्त्र गटाने नाभा तुरूंगात घुसून मिंटूसह सहा जणांना पळून जाण्यास मदत केली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)