खर्ड्यात शिखरशिंगणापूरला जाणाऱ्या भाविकांचे स्वागत

खर्डा – जामखेड तालुक्‍यातील खर्डा येथे शुक्रवारी शिखरशिंगणापूरला जाणाऱ्या भाविकांचे स्वागत करण्यात आले. जय भोले मंडळाचे भाविक वाशिम जिल्ह्यातील तोरणाळा येथून काठी शिखरशिंगणापूरला घेऊन निघाले आहेत. शुक्रवारी ते खर्डा येथे दाखल होताच त्यांचे स्वागत करण्यात आले. महादेवाच्या दर्शनासाठी निघालेले भाविक दरवर्षी खर्डा येथे मुक्कामी येतात. भाविक मार्गस्थ होण्यापूर्वी खर्डा येथील व्यापारी शंकर बरे, राजू बरे, अशोक जंगम यांनी काठीची विधिवत पूजा व शंभू महादेवाची आरती केली. यावेळी शिवभक्‍तांनी काठीचे मनोभावे दर्शन घेतले. शिवभक्‍तांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. “हर हर महादेव..!’ चा गजर करत पायी प्रवास करणारे भाविक शिखर शिंगणापूरकडे रवाना झाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)