खर्डा येथील हरिनाम सप्ताहाची सांगता

खर्डा – जामखेड तालुक्‍यातील खर्डा येथे सीतारामगडावर सीताराम महाराज यांचा तृतीय पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहची काल्याच्या कीर्तनाने नुकतीच सांगता झाला. यावेळी महाप्रसाद वाटपही करण्यात आले. यावेळी लाखो भाविकांनी सीताराम महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. खर्डा व पंचक्रोशीतील भाविक तसेच इतर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने लोक बाबांच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात अन्न दान करण्यात आले.

खर्डा ग्रामस्थांच्या वतीने गडावर येणाऱ्या सर्व भाविकांची योग्य सोय करण्यात आली होती. सात दिवस कीर्तन, प्रवचन, जागर, हरिपाठ, आदी धार्मिक कार्यक्रमाने वातावरण प्रसन्न राहिले. तसेच इंदोरीकर महाराज यांचेही या सप्ताह काळात कीर्तन झाले.काल्याच्या कीर्तनादिवशी रक्‍तदान शिबीर घेण्यात आले. यामध्ये अनेकांनी रक्‍तदान करुन गरजू रुग्णांना मदतीचा हात दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)