खर्डा भाकरी खाऊन खटावकरांची काळी दिवाळी

वडूज : तहसिलदार कार्यालयासमोर खर्डा भाकरी खावून काळी दिवाळी साजरी करताना मान्यवर पदाधिकारी व ग्रामस्थ.

प्रशासनाला कुसळांची दिवाळी भेट

वडूज, दि. 6 (प्रतिनिधी) – शासनाने संपूर्ण खटाव तालुक्‍याचा समावेश दुष्काळग्रस्त यादीत करावा, या मागणीसाठी तालुक्‍यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्त्यांनी तहसिलदार कार्यालयासमोर खर्डा भाकरी खाऊन काळी दिवाळी साजरी केली. यावेळी जनतेच्यावतीने प्रशासनाला कुसळांची दिवाळी भेट देण्यात आली.
अभेद संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शहाजीराजे मित्रमंडळ, खटाव तालुका सोशल फाउंडेशन आदी संस्थांच्यावतीने पुकारण्यात आलेल्या आंदोलनात माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख, रणजितसिंह देशमुख, अनिल देसाई, नंदकुमार मोरे, संदिप मांडवे, सी.एम. पाटील, प्रा. बंडा गोडसे, विजय शिंदे, शहाजीराजे गोडसे, नाना पुजारी, अनिल पवार, तानाजी देशमुख, डॉ. महेश गुरव, अंकुश दबडे, नगराध्यक्ष विपूल गोडसे, सचिन माळी, संदिप गोडसे, दिलीप डोईफोडे, महंमदशरीफ आत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती.
सकाळी अकरा वाजता येथील हुतात्मा स्मारकापासून मोर्चाला सुरूवात झाली. छत्रपती शिवाजी चौक, बस स्थानक मार्गे मोर्चा तहसिलदार कार्यालयात आल्यानंतर मोर्चाचे रूपांतर आंदोलनात झाले. यावेळी देशमुख, मोहिते पाटील, देसाई, मांडवे, गोडसे, पुजारी, आप्पा गोडसे, अमोल यलमर, शकील मुजावर, सुनिल नेटके यांची भाषणे झाली.
यावेळी बोलताना सर्वच वक्‍त्यांनी खटाव तालुका दुष्काळी जाहीर न झाल्याबद्दल शासन व प्रशासनाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच आजच्या आंदोलनाची शासनाने तातडीने दखल घ्यावी, अन्यथा आगामी काळात गनिमी काव्याने उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
विजय शिंदे यांनी प्रास्ताविक केले. धनंजय क्षीरसागर यांनी सुत्रसंचालन केले.
भाषणानंतर प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार जयश्री आव्हाड यांना आंदोलकांनी कुसळांची पेटी दिवाळी भेट दिली. आंदोलनात पृथ्वीराज गोडसे, अनिल माळी, प्रदिप शेटे, इश्‍वरशेठ जाधव, ज्ञानेश्‍वर शिंदे, डॉ. संतोष देशमुख, विनोद देशमुख, दत्ता पवार, प्रताप जाधव, सुरेश देशमुख, बाळासाहेब पोळ, संजय काळे, परेश जाधव, गुरूप्रसाद गोसावी, संतोष पाटोळे, प्रा. सुधाकर कुंभकर, किरण जाधव, संतोष जाधव, शिवाजी पवार, मनोज कदम, शिवाजीराव कदम, प्रतापशेठ जाधव, श्रीकांत लावंड, विष्णू भाऊ जाधव, बाबा फडतरे, अजय खुस्पे, संतोष शहा, धनाजी लवळे आदीसह तालुक्‍यातील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)