खरीप हंगामासाठी खते व बियाणांच्या पुरवठ्याचे योग्य नियोजन करावे – गिरीश बापट

पुणे – यंदा खरिपाच्या एकूण 2.31 लाख हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले असून, खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते व बियाणांचा पुरवठा वेळेत होण्यासाठी योग्य ते नियोजन करावे, अशा सूचना  पालकमंत्री ‍गिरीश बापट यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.खरीप हंगाम 2018  व जलयुक्त शिवार अभियान आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी बोलताना  बापट म्हणाले की, रासायनिक खते विक्रीसाठी थेट लाभ हस्तांतरण या कार्यपद्धतीने जिल्ह्यातील 932 किरकोळ विक्रेत्यांकडे पी.ओ.एस. मशीन कार्यान्वित करण्यात आली आहे. या सर्व विक्रेत्यांवर अधिकाऱ्यांनी लक्ष ठेऊन शेतकऱ्यांना खत पुरवठा होईल याची खबरदारी घ्यावी. रासायनिक खतांबरोबरच सेंद्रीय खतांच्या वापर वाढण्यासाठी देखील प्रोत्साहन देऊन योग्य पद्धतीने नियोजन करावे. मागेल त्याला शेततळे हा शासनाचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम आहे.

या अंतर्गत 2016 ते 2018 या कालावधीत एकूण 1989 शेततळे पूर्ण झालेली आहेत. सन 2017- 18 या वर्षात पुणे ग्रामीण मंडळ अंतर्गत 1296 कृषी पंप वीज जोडण्या दिल्या असून, प्रलंबित वीज जोडणीसाठी 29 हजार 421 कोटी रक्कमेचा अहवाल सादर करण्यात आलेला आहे. प्रलंबित कृषी पंपांना वीज जोडणी देण्यासाठी पुरेशा क्षमतेने कार्यवाही करावी, अशा सूचना देखील त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामांचा आढावाही  बापट यांनी घेतला. मागील प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करावीत तसेच या वर्षातील कामे तात्काळ सूरु करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत असा आदेश यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)